जल जीवन मिशनच्या माध्यमातून खालील बाबींना अनुसरून ग्रामीण जनतेला सहाय्य, सक्षम व सुविधा उपलब्ध करण्यात येईल. i. प्रत्येक ग्रामीण कुटुंब आणि सार्वजनिक संस्था जसे, ग्रामपंचायत इमारत, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, इ. यांना दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सहभागी ग्रामीण पाणी पुरवठा धोरणाचे नियोजन करणे. ii. सन 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक नळ जोडणीद्वारे विहित प्रमाणात व गुणवत्तेसह पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे. iii. पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षेसाठी नियोजन करणे. iv. गावाच्या माध्यमातून ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, मालकी, संचालन आणि देखभाल करणे; v. भागधारकांची क्षमता वाढविणे आणि जीवनमान सुधारण्यासाठी पाण्याचे महत्व याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे.